तुकाराम पाटील यांचा निरोप समारभ


। वाघ्रण । वार्ताहर ।


कोएसो माध्यमिक विद्या मंदीर माणकुळे हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम विठोबा पाटील यांचा निरोप समारंभ दि.29 जून रोजी संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर अध्यक्षा म्हणून शाळा समिती सदस्या शुभांगी पाटील, डॉ. मनोज पाटील, प्रदीप पाटील, रावसाहेब कटरे, सरपंच राजेंद्र पाटील, संजया तुकाराम पाटील व हर्ष पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी संयोजकाच्यावतीने पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला उपस्थीत  वेगवेगळ्या हायस्कूलचे अध्यापक, पि.के. पाटील, सुर्यकांत म्हात्रे, उदय पाटील, के .पी. पाटील, राऊत यांच्यासह दिपक पाटील, संजया पाटील, हर्ष पाटील, तनय पाटील, सुहानी पाटील, रिया म्हात्रे, तन्वी पाटील, साक्षी पाटील आदींनी मनोगत व्यक्त करताना तुकाराम पाटील यांचा स्वभाव शिकवण्याची पद्धत हायस्कूल कार्यक्रमात सहभाग विद्यार्थी गुणवत्ता प्रामाणिक सेवा या बाबत प्रशंसा केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ओ. व्ही. साळवे यांनी केले.

Exit mobile version