तुलिका मान-अवतार सिंग उपांत्यपूर्व फेरीत

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्युदोमध्ये भारताच्या दोन खेळाडूंनी पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तुलिका मानने 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर, अवतार सिंगनेही पुरुषांच्या 100 किलो गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना यूएईच्या जाफर कोस्तोवशी होणार आहे.

भवानी देवी प्री-क्वार्टर फायनलमध्ये तलवारबाजीत भवानीदेवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत. तिने वैयक्तिक सेबरमध्ये उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात रमित आणि दिव्यांश सिंग यांना कांस्यपदकाच्या स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये पदकाची आशा कायम आहे. मनू भाकरची स्पर्धा अजून व्हायची आहे. वुशू : सूर्य भानू प्रताप आणि सूरज यादव उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळतील. जर ते जिंकले तर ते उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत भाग घेतील.

Exit mobile version