तुंगी गावाला विकासाच्या प्रवाहात येणार – महेंद्र थोरवे

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील अंभेरपाडा ग्रामपंचायत मधील डोंगरात वसलेले तुंगी गाव विकासापासून लांब होते. मात्र शिवसेनेच्या माध्यमातून तुंगी गावात देश स्वातंत्र्यानंतर 72वर्षांनी वीज पोहचली आणि 75 वर्षांनी रास्ता पोहचला आहे.त्यामुळे अन्य विकासकामे देखील शिवसेनेचाच मार्गी लावणार आहे. असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी तुंगी ग्रामस्थांना दिला.या गावातील काही विकासकामे यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार थोरवे यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.


तुंगी हे कर्जत तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेले गाव,तसे हे गाव अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे.मागील काही वर्षे सातत्याने शिवसेना पक्ष यांच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून वीज तुंगी गावापर्यंत पोहचली.त्यानंतर रस्ता पोहचला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर वाहन तेथे पोहचले. आमदार झाल्यानंतर प्रथमच महेन्द्र थोरवे यंनी तुंगी गावास भेट दिली. याच भेटी दरम्यान तुंगी गावातील विकास कामांचे भूमिपूजने केले.यात तुंगी येथे नवीन अंगणवाडी बांधणे, स्मशानभूमी बांधणे आणि प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे अशी 30 लाखांची विकासकामे यांची भूमिपूजन केली.ग्रामस्थांनी पहिला खासदार गावात पोहचल्यांनतर पहिला आमदार म्हणून डोंगरात वसलेल्या गावात पोहचल्याने आमदार थोरवे यांची मिरवणूक काढण्यात आली. भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर,कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,तालुका अधिकारी अमर मिसाळ,उपतालुका प्रमूख भरत डोंगरे,युवासेनेचे उपतालुका अधिकारी प्रसाद थोरवे, विभागप्रमुख प्रशांत झांजे, भानुदास राणे, रवी ऐनकर, आदी उपस्तिथ होते.

Exit mobile version