एक रुपयात विमा योजनेकडे पाठ

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

मुदतवाढ देऊनही शेतकर्‍यांचा फारसा प्रतिसाद न लाभल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी केवळ एक रुपयांत पंतप्रधान पिकविमा योजनेतील शेतकर्‍यांचा सहभाग रोडावला आहे. गतवर्षी 19 हजार 515 शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग घेताना 5073.225 हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. त्या तुलनेत यावर्षी योजनेला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती; मात्र यावर्षी त्याहीपेक्षा कमी म्हणजे 13 हजार 515 शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग नोंदवला आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत शेतकर्‍यांनी खरीप हंगाम पिकविम्यासाठी जिल्ह्यातील 13 हजार 855 शेतकर्‍यांनी 3,142.45 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे नुकसान झाले तरी शेतकर्‍यांना मदत व्हावी या उद्देशाने शासनाकडून प्रधानमंत्री पिकविमा योजना राबवण्यात आली होती.

Exit mobile version