तुषार सिनलकर यांचा गौरव

| रसायनी | प्रतिनिधी |

कुचिंग, मलेशिया येथे पार पडलेल्या 10 व्या आशियाई पॅरा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक तुषार सिनलकर यांना
‌‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक‌’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तुषारने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा गौरव वाढविला असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, सीबीडी बेलापूर येथे प्रशंसापत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

Exit mobile version