ब्रेकिंग: उद्या बारावीचा निकाल लागणार; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

। मुंबई । वार्ताहर ।
बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे.
अखेर बोर्डाकडून ८ जून तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे देव पाण्यात असल्याचं चित्र आहे.आता निकालाची तारिख जाहिर झाल्याने विद्यार्धी आणि पालकांची निकालाबाबतची उत्सुकता वाढलीय.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org वेबसाईटवर वर निकाल पाहू शकतील.

Exit mobile version