पालिकेचे वीस दिवस आयुक्तांशिवाय

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची (दि.19) मार्च रोजी बदली झाल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून पनवेल शहर महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक ही पदे रिक्त आहेत. सार्वत्रिक निवडणुकीमुळे त्यांची बदली झालेली आहे.

देशमुख यांनी दोनवेळा पनवेल पालिकेची सेवा केली आहे. 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झालेल्या पनवेल पालिकेवर आतापर्यंत चार अधिकार्‍यांनी आयुक्त म्हणून काम केले आहे. गणेश देशमुख यांचा पहिला कार्यकाळ 18 एप्रिल 2018 ते 20 मे 2020 पर्यंत होता. त्यांच्या जागी सुधाकर देशमुख यांची 20 मे 2020 ते 30 जून 2020 दरम्यान नियुक्ती करण्यात आली. गणेश देशमुख यांचा दुसरा कार्यकाळ 1 जुलै 2021 ते 19 मार्च 2024 असा होता. डॉ. सुधाकर शिंदे आणि गणेश देशमुख हे दोन आयुक्त आहेत ज्यांनी नागरी संस्था निवडणूक-2017 आणि सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी बदली करण्यात आली.

गणेश देशमुख यांच्या बदलीनंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांच्याकडे 20 मार्च पासून आयुक्तपदाचा कार्यभार आहे. रसाळ हे दुसर्‍यांदा पनवेल पालिकेवर प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून लवकरात लवकर अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे मत माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version