| पनवेल | प्रतिनिधी |
अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सचिन गुरव याला वीस वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. आरोपी सचिन मोहन गुरव यास 11 वर्षाच्या व 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश, ए.एस.राजदेरकर यांनी महत्वपूर्ण निकाल दिला.
या खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता प्रतिक्षा वडे यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला. खटल्यातील आरोपी सचिन मोहन गुरव याच्यासह आरोपी संतोष उदयसिंग केवट याच्यावर गुन्हा दाखल होता. न्यायालयाने दोन्ही पिडित मुलींवर केलेल्या बलात्कारप्रकरणी आरोपीस दोषी पकडून 20 वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये 5 हजार रुपये अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता प्रतिक्षा वडे यांनी एकूण 13 साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. त्यामध्ये फिर्यादी दोन्ही पीडित मुली आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच पैरवी कर्मचारी म.पो.शि. प्रियंका नागावकर, पो.ह. सचिन खैरनार यांचे सहकार्य मोलाचे ठरले.







