। महाड प्रतिनिधी ।
निगडे गावात मांडूळाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. महाड वन विभागाने ही कारवाई केली असून आरोपींना महाड न्यायालयात हजर केले आहे. सचिन महादेव पवार (रा.मोहोत बिरवाडी) आणि महेश रमेश मालुसरे (रा.काळीज) हे दोघेजण मांडूळ विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिस्केप आणि आऊल या दोन संस्थांच्या प्रतिनिधींना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ही माहिती महाड वन विभागाला दिली.
त्यानुसार उप वनसंरक्षक रोहा आणि सहा.वन सरंक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल राकेश साहू यांनी भीवघर निगडे रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केाली. आरोपी सचिन पवार आणि महेश मालुसरे यांना मोटारसायकल आणि मांडुळासहित ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या दोन आरोपींनी मांडुळ वाढवून अधिक रक्कम मिळवू, अशा आशेने सात महिन्यापासून जवळ ठेवला होता.