| मुंबई | प्रतिनिधी |
देखभाल आणि दुरूस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार, दि. 15 मार्च रोजी सकाळी 9.30 ते 12 वाजेपर्यंत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याचा परिणाम या मार्गावर धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांवर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास वेळ लागणार आहे. या दरम्यान मार्गावरुन धावणाऱ्या पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये दोन रेल्वे उशिराने सुटणार असून, तीन रेल्वे काही स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक 50108 मडगाव जंक्शन ते सावंतवाडी रोड पॅसेंजर रेल्वेगाडी मडगाव जंक्शनवरुन 1 तास 20 मिनिटे उशीराने सुटेल. ट्रेन क्रमांक 10106 सावंतवाडी रोड ते दिवा एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकावरुन 2 तास उशिराने सुटेल. तर, ट्रेन क्रमांक 10104 मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस करमळी – सावंतवाडी रोड दरम्यान 20 मिनिटे थांबवण्यात येईल. ट्रेन क्रमांक 12051 मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी ते राजापूर रोडदरम्यान 20 मिनिटे थांबवण्यात येईल. ट्रेन क्रमांक 22119 मुंबई सीएसमटी ते मडगाव जंक्शन तेजस एक्सप्रेस रत्नागिरी ते राजापूर दरम्यान 20 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.