सोन्याच्या तस्करी दोघांना अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सोने लपवलेला पुडा आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकला होता. तो स्वीकारण्यासाठी दोघे जण आले असताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्यांना पकडले.

वाय जलालुद्दीन व संजीता बेगम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही चेन्नईतील रहिवासी आहेत. 12 सप्टेंबरला विमानतळावर पुडे फेकले होते. त्यात मेणात सोन्याची भुकटी लपवलेली आढळली. अशा सहा मेणबत्त्या त्या पुड्यात सापडल्या असून त्यात 2534 ग्रॅम सोन्याची भूकटी सापडली. त्या सोन्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. ते सोने स्वीकारण्यासाठी दोघेही आले होते. ते सोने मुंबई विमानतळावरून ते तामिळनाडूमध्ये नेणार होते.

Exit mobile version