विदेशी दारू विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

लाखो रुपये किमतीची विदेशी दारू विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या दोघा इसमांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला वाहनासह जेरबंद करण्यात यश आले आहे.

रविवारी (दि.23) एलसीबीचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे, मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड येथे सापळा रचुन विदेशी दारू विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या इसमास वाहनासह पकडून कोलाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 खंड (अ) (ई), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश श्रीकृष्ण सूर्यवंशी (24) रा.चिंचोळे आवार-नाशिक, अनिल मोतीराम गायकवाड (36)रा.वडोदरा-गुजरात यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 70 हजार रु. किंमतीची विदेशी बनावटीची रॉयल ब्लू व्हिस्कीच्या दारूचे एकुण 1100 बॉक्स,  16 लाख रु. किंमतीचा भारत बेन्झ कंपनीचा ट्रक (GJ-06-BV-9717) असा एकुण 23 लाख 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पो.उप.नि. धनाजी साठे, पो.ह. जितेंद्र चव्हाण, विकास खैरनार, पो.ना. अक्षय जाधव, पो.शि. अक्षय सावंत व सायबरचे पो.शि. अक्षय पाटील या पथकाने केली आहे.

Exit mobile version