गुटखा विकणाऱ्या दोघांना अटक

। मुंबई । प्रतिनिधी ।

वडाळा पूर्वेकडील आदर्श नगरात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांना वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 35 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. वडाळा-चेंबूर मार्गावरील आदर्शनगर बस स्टॉपजवळ काही व्यक्ती बंदी असतानाही बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती वडाळा टीटी पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नवले यांनी त्याठिकाणी धडक देऊन गुटख्याचा साठा जप्त केला. तसेच गुटखा विकणाऱ्या राजा धारकर (30) आणि जुबेर शेख (40) या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लाख 35 हजार किमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.

Exit mobile version