ट्रकमधील डिझेल चोरी करणारी दुकली गजाआड

पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ॲमेटी युनर्व्हसीटी येथील ट्रक पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी करणाऱ्या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह चोरीचे डिझेल असा मिळून जवळपास 1 लाख 62 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

फिर्यादी मोहम्मद साहिल लियाकत अली (28) हे त्यांचे ताब्यातील कंटेनर ट्रक क्र. एचआर-61/ई-6742 हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ॲमेटी युनर्व्हसीटी येथील ट्रक पार्किंगमध्ये पार्क करुन विश्रांती घेत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांचे ट्रकमधील 150 लिटर डिझेल चोरी करुन पळून गेले. अज्ञात चोरट्या इसमांविरूद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गिजे, पोलीस उपनिरीक्षक राजपूत, पोहवा देवरे, कुदळे, तांडेल, धुमाळ, म्हारसे, बाबर, पोशी आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासद्वारे आरोपी प्रमोदकुमार दुर्गा सिंग(31) व अजय उर्फ उम्या गजानन खंदारे (18) या दोघांना नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची स्वीफ्ट डिझायर व 140 लीटर डिझेल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Exit mobile version