| मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात घडलेल्या जनावरांच्या कत्तल प्रकरणी पोलिसांनी दोघाजणांना अटक केली आहे.
गारंबी धरणावर जाणार्या रस्त्याच्या अलिकडील भागात एका झुडपात पाच पाळीव प्राण्यांची कत्तल करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आमंत्रित करण्यात आले होते.
पोलिसांनी घटना घडलेल्या स्थळापासून शेजारील असणारी गावे शिघ्रे, पारगाण, धनगरवाडी आदी. ग्रामस्थांना भेटून अज्ञात व्यक्ती दिसल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. श्वानपथकाने शोध घेऊन सुद्धा आरोपी सापडले नव्हते. परंतु पारगाण जंगल भागात मंगेश हिरवे यांना दोन अनोळखी इसम दिसून आले. त्यांनी तात्काळ मुरुड पोलिसांना खबर दिली. खबर मिळताच पोलिसांनी ट्रॅप लावून या आरोपींना पकडण्यात यश आले.
सदरील आरोपी मुंबई -शिवडी विभागात राहात असून आरोपी एजाज रमजान खान, सलमान सलीम शेख यांच्यावर भा.द.वि.कलम 379, 429 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा 1995 चे कलम 5(ब), 5(क), 9, 9(अ)आदी. नियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील तपास पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक खुतिजा शेख व सहकारी पोलिस करत आहेत.