| उरण | वार्ताहर |
महिलेचा खून करुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या दोन आरोपींना 24 तासांच्या आत न्हावाशेवा पोलिसांनी गजाआड केले आहे. फिर्यादी सलोनी ओमन हेरेंज (38), धंदा गृहिणी, रा. रवींद्र घरत यांची चाळ, से.15, शेलघर, ता.पनवेल जि.रायगड, मुळ रा. जलतांडा, धानामुंजी, जि. कुटी, राज्य झारखंड 8 व मयत महिला अनिता उर्फ आमेरदकानी सरावनन नाडर (36) या दि. 1 एप्रिल रोजी रात्रौ 10.30 वा. फिर्यादीच्या घरी बसली असताना यातील मयत महिला व आरोपी क्र. 1 यांच्यामध्ये पूर्वी झालेल्या भांडणावरून आपसात बाचाबाची चालू होती. या गोष्टीचा राग येऊन आरोपीने महिलेच्या डोक्यात सिमेंटची वीट टाकून जिवे ठार मारले व फिर्यादी यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती केल्या. याप्रकरणी न्हावाशेवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.