घोसाळकर हत्या प्रकरण ;दोघे ताब्यात

| मुंबई | प्रतिनिधी |

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरूवारी मुंबईमध्ये फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने मुंबईसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारा मॉरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची हत्या केली, त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून त्यानेही आपलं जीवन संपवलं. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच 1 पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त केली आहेत.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईचा पीए मेहूल पारिख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतलं आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर यांच्यात झालेल्या संभाषणामधून मेहूल पारिख याच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता ताब्यात घेतलेल्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या दोघांकडून काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Exit mobile version