। पुणे । प्रतिनिधी ।
कल्याणीनगरमधील एका लॉजवर येरवडा पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस हवालदार रामेश्वर नवले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लॉज व्यवस्थापक अमोल भाउसाहेब तांबडे (वय 28, मूळ रा. मांडवे, ता. श्रीरामपूर) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. कारवाईत पोलिसांनी सात हजारांची रोकड व तीन मोबाइलसह 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके करीत आहेत.