वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

। पनवेल । वार्ताहर ।
गरजू महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या दोन दलालांना कामोठे पोलिसांनी सोमवारी दुपारी सापळा लावून अटक केली. उपासना मल्ला (34) व आरती रोकडे (28) अशा या महिलांची नावे असून त्या कामोठे सेक्टर-16 मधील एका फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होत्या. कामोठे सेक्टर-16 मध्ये उपासना मल्ला या महिलेने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.

गरजवंत महिला व तरुणींना चार हजार रुपयांमध्ये वेश्यागमनासाठी देत होती. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबतची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळाल्यानंतर बनावट ग्राहकाला पाठवून ही कारवाई करण्यात आली. तसेच तिघा जणांवर कामोठे पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे.

Exit mobile version