| रोहा | प्रतिनिधी |
पहाटेच्या धुक्यात समोरून येणारी दुचाकी वाहन न दिसल्याने नागोठणे बाजूकडे आलेल्या मोटार सायकलस्वारने कुंडलिका पुलावरसमोर दुसऱ्या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. तर दुसरा एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यज्ञेश संदीप सानप रा. गोफण ता. रोहा हा शुक्रवारी (दि.12) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्यावर ताब्यातील हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल ही नागोठणे बाजू कडून रोहा बाजूकडे घेऊन जात असताना आपली मोटर सायकल रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने घेऊन जात असताना समोर येणाऱ्या दुसऱ्या मोटार सायकल हिस जोरदार ठोकर मारून भीषण अपघात झाला. या अपघातात शिवाजी नारायण शिट्यालकर रा. वरसे ता. रोहा हा गंभीर जखमी झाला आहे. तर यज्ञेश सानप हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाता विषयी मिताली शिवाजी शिट्यालकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. टेमकर अधिक तपास करित आहेत.






