पाच तासांनंतर रेल्वे रुळावर
| पनवेल | वार्ताहर |
कोकण रेल्वे मार्गावरील कळंबोली यार्ड किलोमीटर संख्या केएलएमजी-22 वर रेल्वे संख्या केटीआयजी-एव्हीसी एप्टी बीसीएनच्या मालवाहू रेल्वेमधील दोन रेल्वेचे डबे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. मात्र, याची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे व्यवस्थापनातील कर्मचार्यांनी मिळून पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घसरलेले मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावर पूर्ववत आणण्यात यश मिळवले.
कोकण रेल्वे मार्गावर मालवाहून नेणार्या मालगाडीचे दोन डबे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने रुळावरून घसरले. सदरची घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. याबाबतची रितसर तक्रार साडेसहा वाजता पनवेलमधील स्टेशन मास्तरांकडे नोंदवण्यात आली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे कर्मचारी व्यवस्थापनाने यासंबंधी गंभीर दखल घेऊन रेल्वे रुळावरून घसरलेल्या एसईआर-30079303894, ईआर- 30020261433 या क्रमांकाचे मालगाडीचे डबे पूर्ववत रेल्वे रुळावर आणण्यास प्रयत्न केले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही घसरलेले डबे रुळावर आणून कळंबोलीतील रेल्वे यार्डमध्ये आणण्यात आले. ही महत्त्वाच्या कामगिरी बजावण्यासाठी अवनीश वर्मा, विरेशपत सिंह, आर.के. साळवी, वाय.पी. सिंह, ओ.पी. सिंह, अधिकारी यावेळी उपस्थित होते.