दोन कोरोनामुक्त; 54 रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा प्रशासनाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात बुधवार दि. 4 मे रोजी कोरोनाच्या दोन नव्या रुग्णांची नोंद झाली असून दोन रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 54 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आज पनवेल मनपा हद्दीत दोन नवीन रूग्ण आढळले असून पनवेल मनपा हद्दीतीलच दोन रुग्णाना कोरोना मुक्त घोषित करण्यात आले आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 366 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 614 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर थांबला आहे. सद्यस्थितीत 54 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.