। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातील शिंदे वाडी येथे साफसफाई करत असताना तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रकांत यशवंत तांबे (40) आणि मृदुला वासुदेव वाडकर (60) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






