। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग समुद्र किनारी मंगळवारी धुळवडीनिमीत्त आयोजित बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वारांच्या शर्यतींना अपघाताचे गालबोट लागले आहे. भरधाव बैलगाडी शर्यती पहाणाऱ्या नागरिकांमध्ये घुसल्याने राजाराम धर्मा गुरव (वय 75, रा. झिराड) आणि विनायक नारायण जोशी (वय 70, रा. ब्राम्हण आळी, अलिबाग) हे दोघे जखमी झाले. दोघा जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवत असतांना विनायक जोशी यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे, तर राजाराम गुरव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला जाहे.