। पनवेल । वार्ताहर ।
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू आहेत. त्यानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणार्या सर्व अभ्यागतांना चेहर्यावर मास्क परिधान करणे, तसेच कोव्हिड 19 लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असणार्यांनाच कार्यालयात प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या कार्यालयात येणार्या अधिकारी, कर्मचार्यांसह सर्व अभ्यांगतांना कोव्हिड लसीचे दोन डोस पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र प्रवेशद्वारावर पडताळणी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. तसे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरक्षा विभागास दिले असून, याची गांभीर्याने नोंद घेण्यास सांगितले आहे.
महापालिकेत प्रवेशासाठी दोन डोस बंधनकारक
