राष्ट्रीय स्कूल ट्रॅक सायकलिंग स्पर्धा
| पनवेल | वार्ताहर |
रांची झारखंड येथे 67 वी राष्ट्रीय स्कूल ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचे नुकतेच उदघाटन झाले असुन सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत खारघरची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने दोन सुवर्णपदके पटकावली आहेत.
या स्पर्धेत भारतातून 18 वर्षांखालील शालेय स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यात स्नेहलने 18 वर्षाखालील वयोगटातमध्ये वैयक्तिक व सांघीक सायकलिंग स्पर्धेत भारतात पहिली येत दोन सुवर्ण पदक प्राप्त केली. 900 खेळाडू सहभागी झाले होते. याअगोदर राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे सहा पदके पटकविले आहेत. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, फिनिक्स सायकलिंग क्लब पुणेचे प्रशिक्षक दर्शन बारगुजे यांचे मार्गदर्शन लाभले. या तिच्या यशाबदल सर्व स्तरावरून तिचे आभिनंदन होत आहे.