। रेवदंडा । प्रतिनिधी।
डू वर्ल्ड स्पोर्टस् युथ असोसिएशन इंडिया व कॉम्बॅट मार्शल आर्टस् असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सरी इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2024’ या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे 29 सप्टेंबर रोजी अधेंरी स्पोर्ट्स कॉम्प्लेस येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारत, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, सिंगापूर, व इराण या देशातील एकूण 732 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी रेवदंड्यातील दक्ष दिपेश पाटील याने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत दोन सुवर्णपदके प्राप्त केल्याबद्दल त्याच सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी दक्ष पाटील याने कटा व कुमिते या दोन्ही विभागात सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच, रजाक मुजावर याने कटा व कुमिते- सुवर्णपदक, सार्थक मोरे याने कटा व कुमिते- सुवर्णपदक, मुमूक्ष घरत याने कटा व कुमिते- सुवर्णपदक, समिक्षा पाटील हिने कटा- सुवर्णपदक व कुमिते- रौप्यपदक, श्रीयांस तावडे याने कटा- रौप्यपदक व कुमिते- कांस्यपदक, रूही ठाकूर हिने कटा व कुमिते-कांस्य पदक, तुंबा गोंडेकर याने कटा- कांस्यपदक, आयुष अंबाडे याने कटा- सुवर्णपदक व कुमिते प्रकारात कांस्यपदक मिळविले आहे. या स्पर्धेत अलिबागमधील जपान शी टोर्यू कराटे-डो इंडिया या संस्थेला उत्कृष्ठ चषक प्रदान करून गौरविण्यात आले.