माथेरानमध्ये दोन घोड्यांना ‘सरा’ची लागण

। माथेरान । वार्ताहर ।
पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यटकांच्या प्रवासासाठी घोड्यांचा वापर केला जातो. या प्रवासी घोड्यांपैकी दोन घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाली. येथील पशुसंवर्धन विभागाच्या श्रेणी 1 दवाखान्यात उपचार सुरू झाले असून, येथील डॉक्टर विशेष लक्ष ठेवून आहेत.
घोडा व्यावसायिक राजेश जानकर यांचे घोडे काहीच खाद्य खात नव्हते म्हणून त्यांनी आपले घोडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणीसाठी आणले. येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल कांबळे यांनी या घोड्यांची तपासणी केली असता त्या घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ. अमोल कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता या दोन्ही घोड्यावर उपचार सुरू केले. या घोड्याना इतर घोड्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत.

Exit mobile version