बोर्लीमध्ये दोनशे लिटर दारू जप्त

। दिघी । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानक परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल या वाहनातून टायरच्या ट्यूबमधून लपवून नेली जाणारी तब्बल दोनशे लिटर गावठी दारू दिघी सागरी पोलिसांनी जप्त केली आहे.

बोर्लीपंचतन परिसरातील तरुण गावठी दारूच्या आहारी गेल्याने महिलांनी मागील दिवसात गावागावातून विक्री होणारी गावठी दारू बंद करावी, अशा मागणीचे निवेदन दिघी सागरी पोलीस ठाण्याला दिले होते.

तात्काळ गावठी दारू पूर्णपने नष्ट करण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले असून, काही दिवसांपासून या भागात कडक दारू बंदी करण्यात आली. मात्र, अशातच तालुक्याच्या बाहेरून दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच सापळा रचण्यात आला.

यात टेम्पो ट्रॅव्हल क्र एम एच 06 एस 8052 या वाहनातून टायर ट्युबमधून तब्बल 200 लिटर दारूची वाहतूक होणारी पकडण्यात आली. यातील दारू वाहतून करणारे आरोपी भारत राघो हिरवे, संगीता भारत हिरवे, व ड्राइव्हर अभिजित अशोक श्रीवर्धनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आठवडाभरातील होत असलेल्या कारवाईत ही पोलिसांची कामगारी महत्वाची ठरली.

यामध्ये पोलिसांनी 20 हजारांची दारू व 3 लाखांची टेम्पो ट्रॅव्हलर ताब्यात घेतली आहे. दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली सहा उपनिरीक्षक सचिन निमकर, चव्हान, वाहतूक शाखेचे शशिकांत भोकरे यांच्या सह पोलीस कर्मचारी कैलास बेल्हेकर, सूरज शेडगे, रसाळ, शिदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Exit mobile version