| पनवेल | वार्ताहर |
एसटी बसच्या धडकेने दोघे जण जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील पळस्पे फाटा ते पनवेल जाणाऱ्या रस्त्यावरील न्यू पंजाब हॉटेल समोर घडली आहे. एसटी बसवरील चालक वैभव पेटकर हे बस घेऊन जात असताना वरील ठिकाणी त्याच्या बसची धडक पादचारी सुहान शेख (17) व कैफ खत्री यांना बसून झालेल्या अपघातात हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






