|नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी शनिवारी झालेल्या चकमकीत ‘जैश ए महंमद’चे दोन दहशतवादी ठार झाले. पुलवामा येथे 2019 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या वाहनांवर बॉम्बहल्ला करण्याच्या कटात ते सामील होते.
दाचीग्राम येथील नंबियान आणि मरसर या जंगली भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे सकाळपासून शोधमोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी पाकिस्तानी आहे, परंतु त्याची अजून ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.