मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर वावे दिवाळी गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 25) संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडीला भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून पुलाचा कठडा तोडून सुमारे 25 ते 30 फूट खोल नदीत खाली कोसळली. अपघातात एक महिला व पुरुष जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, भरधाव येणारी कर नदीवरील पुलाच्या कठड्याला ठोकून हा कठडा तुटून पुलात आदळली. त्यावेळी गाडीच्या अपघाताने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाच्या खाली कोसळली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर तीन कि.मी अंतरावर वावे दिवाळी गावच्या हद्दीत 25 नोव्हेंबर संध्याकाळी 5 वा.च्या सुमारास महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असलेली मारुती सुझुकी सेलेरिओ गाडी एमएच 16 बीएच 4829 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. या गाडीमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून, चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. मयतांमध्ये 1 महिला देवयानी दशरथ दुदुमकर व एक पुरुष दशरथ दुदुमकर अशी नावे असून, ते अँटॉप हिल मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. ग्रामस्थ व क्रेनच्या सहाय्याने मारुती कार गाडीला वर काढण्यात आले आहे. जखमी कार चालकाला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले आहे.