| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. “हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही,” असे हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.