एक्स्प्रेस वे वर अपघातात दोघे ठार

खोपोली | वार्ताहर |
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रेलरने चार वाहनांना धडक दिल्याने ट्रेलर चालक आणि क्लीनर या दोघांचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.या अपघातात अनिता सिंग वय 54 गंभीर, अखिलेश सिंग वय 55 रा. रोसे – पारडे, पुणे. हे दोघे जखमी झाले असून,त्यांच्यावर एमजीएम कामोठे येथे दाखल केलेले आहे.
चालकाचे ट्रेलरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरची पहिली धडक एका हुंडाई कारला दिली, त्यानंतर काही अंतरावर दुसरी धडक क्रेटा कारला दिली. त्यामुळे क्रेटा कार मिडील गार्डन मध्ये गेली, पुढे जाऊन किलोमीटर काही अंतरावर ट्रेलरने ईरटीगा गाडीला धडक दिली. तर पुढे पुन्हा बोलेनो गाडीला धडक दिली. त्यामुळे ती गाडी उलटली व 100 काही अंतरावर तो ट्रेलर जाऊन महामार्गाच्या डाव्या बाजूस कलडला. ट्रेलरने एकूण चार वाहनांना धडक दिली.सुदैवाने त्या चारी गाड्यातील प्रवाशांना किरकोळ मार लागलेला आहे, त्यापैकी दोघांना एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केले.

Exit mobile version