। रेवदंडा । प्रतिनिधी ।
भोईघर नजीक बामणकोंंडी वळणावर रिक्षा पलटी होऊन अपघात घडला. या अपघातात रिक्षातील पती-पत्नी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोंबिवली सोनारपाडा येथे राहणारे जगदीश मोतीराम वणे (वय 35) व जोन्सा जगदीश वणे (वय 28) हे दोघे मुरूड तालुक्यातील काजूवाडी येथे रिक्षाने आले होते.
ते दोघेही शुक्रवारी (दि.7) रात्री साडेआठचे सुमारास काजूवाडी ते भोईघर मार्गे बोर्लीकडे येत असताना रिक्षा बामणकोंडी वळणावर पलटी झाली. त्यांना लागलीच बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथील डॉक्टरांनी ते दोघेही मयत झाल्याचे सांगितले. सुदैवाने रिक्षा चालक अभिषेक चंद्रकांत राजापरकर हा या अपघातातून बचावला. या अपघाताचा अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश म्हात्रे हे करत आहेत.







