दोन अपघातात दोघांचा मृत्यू; एक जखमी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पनवेलजवळील जेएनपीटी ते पळस्पे जाणार्‍या हायवेवर कुंडेवहाळ परिसरातून आरोपी मयत चालक किरण अण्णा मुळीक (35) याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने चालवून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली. यात तो गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू पावला. तर, त्याचा सहकारी रामबरन यादव (22) हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर, दुसर्‍या घटनेत फुडलँड कंपनीच्या बाजूला बस स्टॉपजवळ एका ट्रेलरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात जयप्रकाश सिंग यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ट्रेलर चालक प्रसार झाला आहे. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version