दोघे जखमी
। कोलाड । प्रतिनिधी ।
रोहा-कोलाड मार्गांवर संभे गावाच्या हद्दीतील मोरीजवळ स्कुटीचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. दिनेश भिकू पवार (विठ्ठल नगर, पो. रातवड, ता. माणगांव) आणि जावीर इब्राहिम शाह (रा. धाटाव, मुळगाव सिधावे टोला रामटोकोला कसीया कशिनगर उत्तरप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अशपाक मोहम्मद फारूख अली (रा. वार्ड नं.10 शक्ती नगर कसीया कुशीनगर उत्तरप्रदेश) व मोहन पवहारी सिंग (रा. सिधावे टोला रामटोकोला कसीया कुशीनगर उत्तरप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.5) रात्री साडेनऊच्या सुमारास दिनेश भिकू पवार हा त्याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटार सायकलवरून धाटाव ते कोलाड असा प्रवास करीत होते. यातील मृत स्कुटीचालक जावीर इब्राहिम शाह (रा. धाटाव ता.रोहा) यांने आपल्या ताब्यातील स्कुटी स्वतः चालवीत त्या स्कुटीच्या पाठीमागे जखमी साक्षीदार याला बसवून कोलाड ते धाटाव असा प्रवास करीत असतांना मौजे संभे गावाच्या हद्दीत मोरिजवळ आले असता यातील मयत दिनेश भिकू पवार याच्या ताब्यातील मोटार सायकल यास चुकीच्या साईडला येऊन जोरदार धडक दिली. या अपघातात दिनेश भिकू पवार याच्या मरणासह स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरले. यांना तात्काळ प्राथमिक आरोग्याकेंद्र आंबेवाडी येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे सो. रोहा, सपोनि कुलकर्णी सो. नागोठणे पोलीस कार्यभार कोलाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस अंमलदार पोसई भोजकर करीत आहेत.







