चार जण गंभीर जखमी
। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजीनगर येथे भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने शहरातील काळा गणपती मंदिराजवळ पाच ते सहा जणांना उडवले. हा अपघात शुक्रवारी (दि. 04) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
सिडको परिसरातील काळा गणपती मंदिरासमोर शुक्रवारी सकाळी भरधाव कारने दर्शनासाठी येणाऱ्या पाच ते सहा नागरिकांना उडवले. कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या भीषण अपघाताच्या घटनेनंतर कारचालक फरार झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.