| भंडारा | प्रतिनिधी |
भंडारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात गर्दीत गाठत दोन तरुणांवर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी (दि.9) रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. जुन्या वैमानस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील मृतांची ओळख पटली असून, वसीम उर्फ टिंकू खान (35) आणि शशांक गजभिये (30) असं दोन्ही मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुस्लिम ग्रंथालय संकुलातील रहिवासी असून, शनिवारी रात्री गाडीतून खाली उतरताच पाच-सहा अज्ञात हल्लेखोरांनी चाकू आणि लोखंडी रोडने त्यांच्यावर हल्ला केला.





