पोलिसांच्या वाहनावर दगड मारून दोघे फरार

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

झोन थ्री स्ट्राइकिंग वाहनावर दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी दगड मारून ते पळून गेले. या प्रकरणी दोन अनोळखी ईसमांविरोधात मंगळवारी (दि.16) रात्री खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत तृतीय पंथीयांना हुसकावण्यासाठी हद्दीतील स्टील मार्केट आणि पुरुषार्थ ब्रिज येथे झोन थ्री स्ट्रायकिंग वाहनाने पोलिसांनी भेटी दिल्या. यावेळी त्या ठिकाणी तृतीयपंथी आढळले नाहीत. त्यानंतर स्ट्रायकिंग वाहन खारघर पोलीस ठाणे हद्दीत कारवाईसाठी गेले. यावेळी बेलपाडा येथील खारघर रेल्वे स्टेशनच्या स्कायवाक ब्रिजच्या पुढे काही तृतीयपंथी आढळून आले त्यांना हुसकावण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी काही इसम उभे होते त्यांनादेखील पोलिसांनी हुसकावले. यावेळी पोलिसांचा स्टाफ तेथून निघण्याच्या तयारीत असताना रात्री एकच्या सुमारास दोन अनोळखी ईसम दुचाकीवर आले. त्यांनी स्ट्राइकिंग वाहनाच्या चालकाच्या बाजूला दगड मारून ते दुचाकीवरून पळून गेले. यात आरशाची काच फुटून नुकसान झाले आहे.

Exit mobile version