आरोपीला अटक
। खोपोली । प्रतिनिधी ।
आईस्क्रीमचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लिल चाळे करणार्या उमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन (वय37,रा. शिळफाटा)याला अटक करण्यात आली आहे.न्यायलाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी उमेदभाई आणि पीडित अकरा वर्षे व नऊ वर्षीय मुली पटेलनगर नॅशनल गॅरेज शिळफाटा खोपाली येथे एकाच गल्लीमध्ये समोरासमोर राहण्यास आहेत. उमेदभाई याने पीडित मुलींना आईस्क्रिमच्या बहाण्याने घरात नेऊन पिडीत मुलींसोबत अश्लिल वर्तन केले. सदर प्रकार कोणला सांगितला तर मार पडेल अशी धमकी उमेदभाई यांनी दिली. त्यामुळे भीती पोटी मुलींनी सदरचा प्रकार घरात सांगितला नाही. परंतु मुलींच्या वागण्यातील फरक मुलींच्या आईनी ओळखून विश्वासात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलींच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठत आरोपी ऊमेदभाई हरिजन विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक हरिश काळसेकर हे करीत आहेत.