। मुंबई । प्रतिनिधी ।
आमिषापोटी, भीतीपोटी किंवा कोणत्याही कारणास्तव जे आमदार, खासदार शिवसेना सोडून गुवाहाटीला गेले आहेत ती खरी शिवसेना नाही, तर काल वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना जे रस्त्यावर उभे असणारे कार्यकर्ते होते, तो खरा शिवसेना पक्ष, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी 18 ते 20 आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचा दावाही यावेळी राऊतांनी केला. तर, आज नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे दोन आमदार हे पत्रकार परिषद घेणार असून तेच तुम्हाला सगळी पडद्यामागच्या कहाणी सांगतील असेही ते म्हणाले. तसेच, संपर्कात असलेले 20 आमदार मुंबईत आल्यानंतर सगळा खुलासा होईल असं वक्तव्यही त्यांनी केलं.