। पुणे । वृत्तसंस्था ।
आरोग्य भरती प्रक्रियेत सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पेपर फुटीच्या घटनेने खळबळ माजली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात आरोग्य भरती गट क चा पेपर फुटला होता. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत पोहोचले आहेत. आता पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली असून यात अमरावतीच्या निशिद गायकवाड आणि त्याच्या मित्राचा समवाशे आहे. दोघांना नागपूरमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आतापर्यंत आरोग्य विभागाच्या या पेपर फुटी प्रकरणात न्यासा कंपनीच जबाबदार असल्याची माहितीसुद्धा पुणे पोलिसांनी दिली. आतापर्यंत 28 जणांना अटक कऱण्यात आली असून 6 कोटींची रक्कम आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याची अद्याप चौकशी सुरु असल्याचंही पुणे पोलिसांनी सांगितले.