। पनवेल । वार्ताहर ।
हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या केयूर जयेश गोगरी या तरुणाला अटक करण्यात आल्यानंतर या तस्करीत सहभागी असलेल्या आणखी दोन तरुणांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. मोहम्मद आमान सलीम शेख (20) व हित मुकेश पटेल (22) अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही केयूर गोगरी याच्याकडून हायड्रो गांजा घेऊन ते खारघरमधील मुलांना विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
खारघरमध्ये राहणारा केयूर गोगरी हा राहत्या घरातून अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने 30 ऑक्टोबर रोजी खारघर सेक्टर-19 मधील शिवसाई बिल्डिंगवर छापा मारला होता. त्या वेळी केयूर गोगरी यांच्या कारमध्ये 800 मिलीग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा सापडला होता. अमली पदार्थ विरोधी पथकाने केयूर गोगरी याला एनडीपीएस कलमाखाली अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे अधिक केयूर गोगरी याच्या चौकशीत त्याने भांडुप येथे राहणाऱ्या शारीख याच्याकडून हायड्रो गांजा आणून त्याची विक्री करत असल्याचे कबूल केले आहे. शरीख हा थायलंड येथून छुप्या मार्गाने हायड्रो गांजा भारतात आणून त्याची आपल्या हस्तकांमार्फत विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने शरीख व नोमान या दोघांचा शोध सुरू केला आहे. चौकशी केली असता, तो सदरचा हायड्रो गांजा भांडुप येथे राहणारा त्याचा मित्र शारीख व उलवे येथे राहणारा नोमान याच्याकडून आणत असल्याची कबुली दिली. तसेच कळंबोली येथे राहणारा मोहम्मद आमान सलीम शेख व खारघरमध्ये राहणारा हित मुकेश पटेल हे दोघे केयूर गोगरी याच्याकडून हायड्रो गांजा घेऊन ते खारघरमधील मुलांना विकत असल्याचे देखील त्याने सांगितले. त्यानुसार मोहम्मद अमान शेख व हित पटेल या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप निगडे यांनी दिली.
हायड्रो गांजा तस्करीप्रकरणी आणखी दोघे अटकेत
