दोघेजण गंभीर जखमी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
दोन मोटारसायकल मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालक गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. रात्री 8 च्या सुमारास कार्लेखिंडीत हा अपघात झाला. जाहिर सय्यद रा. चोंढी (वय 30) आणि अनिकेत मोकल (वय 25) रा. नारंगी असे या अपघातात जखमी झालेल्या दोन व्यक्तींचे नाव आहे. जाहिद कार्लेखिंडीतून चोंढी कडे आपल्या घरी जात होता. त्याच वेळी नारंगीकडे जात असलेल्या मोकल यांच्या समोरून आलेल्या मोटारसायकल जवळ समोरासमोर ठोकर झाली. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी असल्याने प्रथोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविले जात आहे.