सिडकोच्या दोन अधिकार्‍यांना लाच घेताना अटक

| नवीन पनवेल | वार्ताहर |

सिडको नोडल ऑफिसचे संरचनात्मक दुरूस्ती केलेल्या कामाचे बिलमंजुरी करीता आवश्यक असलेल्या इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर स्वाक्षरी करण्याकरीता 15 हजारांची मागणी करणार्‍या सिडको अभियंत्यासह एका सेवानिवृत्त सह कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबईने रंगेहाथ पकडले आहे.

नवीन पनवेल सिडको कार्यालयात अधीक्षक अभियंता असलेल्या प्रकाश बालकदास मोहिले (वय 57 वर्षे) यांनी तक्रारदाराकडून नवीन पनवेल येथील सिडको नोडल ऑफिसचे संरचनात्मक दुरूस्ती केलेल्या कामाचे बिलमंजुरी करीता आवश्यक इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट रिपोर्टवर स्वाक्षरी करण्याकरीता 15 हजारांची मागणी केली. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईकडे तक्रार दाखल केली असता ठाणे शहर पश्‍चिम प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त तथा अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक (अति कार्य.) डॉ. पंजाबराव उगले, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो अपर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सत्येची पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार नविन पनवेल सिडको कार्यालयात तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना सेवानिवृत्त सह कार्यकारी अभियंता संजय हरिभाऊ डेकाटे (वय 58 वर्षे) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांनतर मोहिले यांना कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version