लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील दोन पक्ष गायब होतील

पृथ्वीराज चव्हाण यांचे भाकित

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमनेसामने आहेत. तीन-तीन पक्ष दोन्ही बाजूला आहेत. या निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसे दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत, असे भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यांनी दोन राजकीय पक्षांची नावे घेतली नसली, तरी त्यांचा रोख शिंदे व अजित पवार यांच्याकडे असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघांत मंगळवारी मतदान पार पडले. दि. 13 मे आणि 20 मे या दोन दिवशी अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. 4 जून रोजी देशभरातील सर्व जागांची मतमोजणी होईल. मात्र त्यानंतर दोन पक्ष लोप पावतील, असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवल्याने तर्क 8211; वितर्कांना उधाण आले आहे. हे दोन पक्ष कोण याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. दोन पक्ष नेमके कोणते? याबाबत त्यांनी भाष्य केले नसले, तरी त्यावरून अंदाज बांधले जात आहेत.

Exit mobile version