| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील खैरवाडी जवळील मोरबे धरणात आपला मित्र मैत्रिणींसह सहलीसाठी गेलेल्या अवधूत भोसले (वय 24) याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याने त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात अली आहे. तर दुसऱ्या घटनेत दापोली पारगाव येथे राहणार राहुल जितेकर (वय 32) हा त्याच्या स्कुटीवरून पनवेल कडून कळंबोलीकडे चिंचपाडा ब्रिजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडकडे जाण्यासाठी यु टर्न घेत होते. यावेळी चिंचपाडा ब्रिजकडून कळंबोली सर्कलकडे येणाऱ्या कैलास खारडे यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहन वेगाने चालवीत त्याच्या स्कुटीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघात राहुल जितेकर याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.