दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यात एका दिवसात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिता मंगेश सरफरे (42), रा. वरळी कोळीवाडा या आपल्या पतीसह दुचाकीने अलिबाग येथील आजारी वडिलांना भेटण्यासाठी सायन-पनवेल मार्गाने जात असताना त्यांच्या दुचाकीला कळंबोली येथील पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ भरधाव डम्परने जोरदार धडक दिली. यात अनिता सरफरे गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी डंपर चालक छोटन यादव याला अटक केली आहे. तर, दुसऱ्या घटनेत तळोजा येथील नावडे गावासमोरील रस्त्यावर मिलिंद भिकाजी सुरडकर (55) हे रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. घडकेनंतर वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Exit mobile version