| माणगाव | वार्ताहर |
माणगाव-पुणे रस्त्यावर आयशर गाडीला इको गाडीवरील चालकाचा वळणावर ताबा सुटल्याने इको गाडीला धडकून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात माणगावजवळील निजामपूर बागवाडी गावच्या हद्दीत दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघात गुन्ह्याची फिर्याद आयशर गाडी चालक नवनाथ नामदेव ढोकळे(29) रा.वारक, ता. मुळशी, जि. पुणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अपघात ठिकाणी यांतील फिर्यादी नवनाथ नामदेव ढोकळे हे त्यांच्या ताब्यातील आयशर गाडी (क्र.एम.एच.12 एस.एफ.8864) घेऊन पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे घेऊन येत असताना माणगावजवळील बागवाडी गावच्या हद्दीत आल्यावेळी माणगाव बाजूकडून इको गाडीवरील (क्र.एम.एच.14 एच. के.3709) चालक सुरेंद्र राजेंद्र सावंत (26) रा.चाकणवाडी, ता. खेड, जि. पुणे याचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पो गाडीला समोरून धडक लागल्याने झालेल्या अपघातात इको चालक सुरेंद्र राजेंद्र जाधव व अमोल शिवाजी पारधी (28) रा.वाकी ता.खेड जि.पुणे हे दोघे जखमी झाले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. भोजकर करीत आहेत.







